Supporting Differently-Abled & Orphaned Children
Learn More
🙏 प्रिय बंधू-भगिनींनो,
श्री संत सावता माळी शिक्षण प्रसारक मंडळ, गोजुबावी, ता. बारामती, जि. पुणे या संस्था बारामती तालुक्यातील
मतिमंद, दिव्यांग व अनाथ मुलांसाठी निवासी पुनर्वसन केंद्र स्थापन करत आहे.
आज बारामती तालुक्यात सुमारे १५० प्रौढ मतिमंद व्यक्ती असून इंदापूर, दौंड व पुरंदर तालुक्यांमध्ये अजूनही ३६० पेक्षा जास्त मतिमंद मुलं व व्यक्ती आहेत. त्यांच्यासाठी आजही स्थायी पुनर्वसन केंद्रांची कमतरता आहे.
आम्ही मतिमंद मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी शेती, संस्कृती व थेरपीच्या माध्यमातून त्यांचे मानसिक, सामाजिक व व्यावसायिक पुनर्वसन करणार आहोत. हे केंद्र केवळ शिक्षणाचे नव्हे, तर **जीवनात परिवर्तन घडवणारे ठिकाण** ठरणार आहे.
आमच्या भागातील MIDC मधील कंपन्यांशी संलग्नता साधून या विशेष मुलांना प्रशिक्षणानंतर रोजगाराच्या संधी मिळवून देण्याचा आमचा प्रयत्न आहे.
या पुण्यकार्यात सहभागी होण्यासाठी आपण आर्थिक मदत, वस्तूंची मदत किंवा स्वयंसेवी वेळ देऊ शकता. तुमच्या सहकार्यामुळेच या दिव्यांग मुलांचे आयुष्य उज्वल होईल.
श्री संत सावता माळी शिक्षण प्रसारक मंडळ
गोजुबावी, ता. बारामती, जि. पुणे
📱 मोबाईल: +91-9923871215
📧 ईमेल: sssspmandal2013@gmail.com
Gallery